Khalapur Landslide Saam Tv
महाराष्ट्र

Khalapur Landslide: रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

Irshalgad Landslide: खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्रीच्या सुमारास भलीमोठी दरड कोसळली.

Shivani Tichkule

Khalapur Irshalgad Landslide: रायगड जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर (Raigad News) बुधवारी रात्रीच्या सुमारास भलीमोठी दरड कोसळली. यामध्ये संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली दबलं असून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनही शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्य झाला आहे. घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरत आहे.

प्राथामिक माहितीनुसार, आतापर्यंत २० ते २२ जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. सध्या २५ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून ५ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप १०० हून अधिक जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Landslide News)

ही दुर्देवी काल रात्री 10.30 ते 11 वाजता घटना घडली. या गावात सुमारे 40 घरे असून ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच ही दरड कोसळली. ही घटना घडताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली.

पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी, दादा भुसे, गिरिश महाजन घटनास्थळी दाखल झाले असून, आदिती तटकरे यांच्याकडूनही कडूनही प्रशासनासह बचावकार्य करणाऱ्या पथकांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT