Kdmc Hospital: 9 Doctors Transferred Suddenly Amid Healthcare Concerns saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! KDMC रुग्णालयांमध्ये मोठा फेरबदल; ९ डॉक्टरांच्या तडकाफडकी बदल्या

KDMC Hospitals Doctors Transferred : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने ९ डॉक्टरांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. रुग्णालयातील आरोग्यसेवेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयावर सवाल उपस्थित होत आहेत.

Bharat Jadhav

  • केडीएमसीच्या आरोग्य विभागाने ९ डॉक्टरांच्या बदल्या.

  • महापालिका रुग्णालयांमधील आरोग्यसेवेबाबतच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निर्णय

  • उपचार मिळत नसल्याच्या घटनांमुळे रुग्णालय प्रशासन चर्चेत होते.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालय विविध कारणामुळे चर्चेत आहे. रुग्णालयात योग्य प्रकारे आरोग्य उपचार मिळत नसल्याच्या घटना समोर आल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. महापालिकेच्या आरोग्य खात्याने ९ डॉक्टरांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र या बदल्यामुळे आरोग्य सेवा सुधारणा आहे का? असा सवाल महापालिकेतील सदस्यांनी उपस्थित केलाय.

कोणत्या डॉक्टरची कुठे झाली बदली?

डॉ. विनोद दोंड हे शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत होते. त्यांची बदली आता महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागात करण्यात आली आहे. डॉ. पौर्णिमा ढोके या आरोग्य मुख्यालयात होत्या. त्यांची बदली डोंबिवलीतील मढवी नागरी आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. डॉ. प्रतिभा पानपाटील या मढवी नागरी आरोग्य केंद्रात होत्या. त्यांची बदली शास्त्रीनगर रुग्णालयात करण्यात आली आहे.

डॉ. पराग मढवी, विजय कुवर आणि संदीप पगारे हे रुक्मिणीबाई रुग्णालयात होते. त्यांची बदली शास्त्रीनगर रुग्णालयात करण्यात आली तर शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. संतोष केंभावी, कविता मढवी आणि प्रशांत चौधरी हे शास्त्रीनगर रुग्णालयात होते. त्यांची बदली रुक्मिणीबाई रुग्णालयात करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय सेवा चर्चेत आली होती. त्यानंतर एका रुग्णाला चांगला उपचार दिला जात नसल्याची घटना समोर आली. रुक्मिणीबाई रुग्णालयात एका अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई राहिल्याची धक्कादायक घटना घडली. तर एक रुग्णाचा पाय फॅक्चर झाल्यावर त्याला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले असता त्याच्या पायाला प्लास्टर ऐवजी पुठ्ठा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

या घटनांच्या आधी एका सदस्याने स्थायी समितीच्या सभेत रुग्णांना उपचारासाठी वापरले जाणारे बँडेज निकृष्ट दर्जाचे असल्याचा खुलासा केला होता. शास्त्रीनगर रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी सुवर्णा सरोदे या महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. याशिवाय कल्याण पूर्वेतील शक्तीधाम या प्रसूती गृहात प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ एका महिलेचे बाळ दगावले होते. टिटवाळ्यातील रुक्मीणी प्लाझा या प्रसूतीगृहात एका महिलेची प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करताना तिला घातलेले टाके पिकल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती.

महापालिकेने शक्तीधाम आणि रुक्मिणी प्लाझा ही प्रसूतीगृहे बाह्य संस्थेला चालविण्यास दिलेली आहे. रुक्मीणी प्लाझा प्रसूती गृहात सोनोग्राफीच्या नावाखाली जास्तीच्या पैसे उकळले जातात असा गंभीर आरोप भाजप नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी केला होता. या सगळ्या घटनानंतर ९ डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

गोकुळ निवडणुकीवरून राजकारण रंगलं, जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT