sangli, bjp , ncp, kavathe mahankal nagar panchayat president election, congress saam tv
महाराष्ट्र

Political News : राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपाच्या गाेटात ? राेहित पाटील गटाची आज कसाेटी

आज दुपारपर्यंत या निवडी जाहीर होतील.

विजय पाटील

Political News : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ (kavathe mahankal nagar panchayat president election) नगर पंचायतीत आज (शुक्रवार) नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक हाेत आहे. याबराेबरच सांगली (sangli) महापालिकेत सभापती पदासाठी निवडणूक हाेत आहे. या दाेन्ही पदांच्या निवडीत चूरस निर्माण झाली आहे. (Sangli Latest Marathi News)

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळातील नगर पंचायत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. पण राष्ट्रवादीतले काही नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत अशी चर्चा आहे. (Maharashtra News)

स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित (rohit patil) यांनी एक हाती सत्ता नगरपंचायतीत मिळवली होती. मात्र या फुटीच्या राजकारणामध्ये आणि आजच्या निवडीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे कवठेमंकाळ नगरपंचायती ठिकाणी पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला आहे. (Breaking Marathi News)

सांगली महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने (BJP) अस्मिता सलगर तर समाज कल्याण समितीच्या सभापती पदासाठी अनिता वनखंडे हे उमेदवार आहेत. काँग्रेस (congress) राष्ट्रवादी (ncp) आघाडीकडून या पदांसाठी काँग्रेसच्या आरती वळवडे आणि कांचन कांबळे या उमेदवार आहेत. आज दुपारपर्यंत या निवडी जाहीर होतील.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT