'कात्रजचा खून झाला'; कात्रज चौकातील बॅनरने चर्चांना उधाण अमोल कविटकर
महाराष्ट्र

'कात्रजचा खून झाला'; कात्रज चौकातील बॅनरने चर्चांना उधाण

हा बॅनर आता महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून उतरविण्यात आला आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे - पुण्यातील Pune कात्रज Katraj चौकात लागलेल्या "कात्रजचा खून झाला" या बॅनरने Banner संपूर्ण परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. कात्रज चौकातील एका खाजगी प्लॉटवर अज्ञातांकडून हा भला मोठा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर आता महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून उतरविण्यात आला आहे.

हे देखील पहा -

अज्ञातांकडून रात्रीच्या सुमारास लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे कात्रज येथील राजकारण तापते काय? की यामागे आणखी काही वेगळे कारण आहे? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र या बॅनरमुळे संपूर्ण कात्रज परिसरात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात कात्रज येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा संप्पन झाला. कदाचित या उड्डाणपुलामुळे कात्रज चौकातील अनेक उद्योगधंद्यांच्या बाबतीत फरक पडणार की काय? किंवा ज्या खाजगी जागेत हा बॅनर लावला आहे, त्या जागेमुळे हा बॅनर लावण्यात आला आहे का? अशा देखील चर्चांना सर्वत्र उधाण आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT