Kass  
महाराष्ट्र

कास पुष्प पठार बहरण्यासाठी १५ दिवसांचा अवधी; पर्यटनास प्रारंभ

ओंकार कदम

सातारा : पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ज्या ठिकाणाकडे पाहिले जाते ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील कास Kass पठार. या पठारावर येणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे गालिचे पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. मागील वर्षी कोरोनाच्या सावटाखाली सर्वत्र पर्यटन बंद होते. त्यामुळे कास पठार सुद्धा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. यंदा बुधवारपासून (ता.२५) पर्यटकांसाठी पठार पाहण्यासाठी खूले करण्यात आले असली तर सध्या तुरळक प्रमाणत फुले आलेली पाहयला मिळत आहेत.

या पठारावर येण्यासाठी ऑनलाइन नाेंदणी असून प्रति व्यक्तीकडून शंभर रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. सध्या ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केले नसेल त्यांना जागेवर सुद्धा नाेंदणीची सुविधा उपलब्ध आहे. सध्या या पठारावर चवर या प्रजातीची पांढऱ्या रंगाची फुले मोठ्या प्रमाणात आली आहेत. परंतु इतर फुलांचा बहार येण्यासाठी साधारण सप्टेंबरचा पहिला आठवड्यापर्यंत पर्यटकांना वाट पाहावी लागणार आहे.

कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार हे कळताच आता कासला पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.परंतु कमी प्रमाणात आलेल्या फुलांच्या बहार पाहून पर्यटकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे आलेले पर्यटक सध्या पठारावरील नयनरम्य वातावरणाचा आनंद घेत आहेत. येत्या पंधरा दिवसात या फुलांचा बहार वाढल्यावर पुन्हा पर्यटक कासला भेट देतील. सध्या पर्यटकांना फुलांचा बहार पाहायला न मिळाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे घरातच बसून राहिल्याने पर्यटकांची पावले आता हळूहळू पर्यटनस्थळ शोधायला लागली आहेत. त्यातच कास म्हणजे पर्यटकांसाठी पृथ्वीवरील स्वर्गच असल्याने पर्यटक या पठाराला प्रथम पसंती देत असतात. आज पासून जरी हे पठार लोकांना पाहण्यासाठी खुल केलं असेल तरी या पठाराचे साैंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान काेविड १९ च्या पार्श्वभुमीवर कास पठाराचे व्यवस्थापन श्रीरंग शिंदे (निवृत्त वनपाल) आणि मारुती चिकणे (अध्यक्ष,कास पठार कार्यकारी समिती) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून पर्यटकांची याेग्य ती काळजी घेऊनच पठार पाहण्यासाठी साेडले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

PSI Transfer : महाराष्ट्रात बदल्यांचा धडाका! ४३ PSI सह ३९९ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

भाजप सरकारमध्ये मोठा फेरबदल होणार; कोणाकोणाला मिळणार डच्चू?

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT