Beed Breaking: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील निकाल राखीव Saam Tv
महाराष्ट्र

Beed Breaking: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील निकाल राखीव

....त्यावरील सुनावणी उद्या होणार आहे.

विनोद जिरे

बीड: करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यावरील सुनावणी उद्या होणार आहे. प्राणघातक हल्ला आणि ॲट्रॉसिटी ऍक्टच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या, करुणा शर्मा यांचा पुन्हा दोन दिवसानं कोठडीतील मुक्काम वाढवण्यात आला होता. अंबाजोगाई सत्र न्यायालयाने आज सुनावणीची तारीख दिली होती. शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती.

दरम्यान, करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून फिर्यादी विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीवरून, करुणा शर्मासह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर परळी शहर पोलीस ठाण्यात, गु.र.न 142-2021 कलम 307, 323, 504, 506, 34, 3 (1)(r), 3(1), 3(2) सह ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला होता.

परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर, 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. शर्मा यांची ऍड.भारजकर यांनी बाजू मांडली होती तर सरकारच्या वतीने अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली. दरम्यान, दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकल्यानंतर आज निर्णय देणं अपेक्षीत होतं परंतु तो राखून ठेवण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT