karuna munde  saam tv
महाराष्ट्र

karuna munde | 'मी वंजारा समाजाची सून...'; करुणा मुंडे भगवान गडावर दसरा मेळावा घेणार

डॉ. माधव सावरगावे

Karuna Munde News : भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यावरून पाच वर्षांपूर्वी पंकजा मुंडे विरुद्ध महंत नामदेव शास्त्री असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला होता. आता पुन्हा त्याच भगवान गडावरील मेळाव्यावरून संघर्ष दिसण्याची चिन्हे आहेत. आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यानंतर करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे.

यंदाच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा भगवान गड चर्चेत येणार असं दिसत आहे. कारण माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या एकेकाळच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधील सहकारीनी करुणा मुंडे यांनीही भगवान गडावर यंदा दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यात दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे आणि आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेत संघर्ष सुरू असतानाच आणखी एक वाद निर्माण होईल असं दिसतं आहे. 'मी देखील वंजारी समाजाची सून असल्याने आणि मुंडेंच्या एकुलत्या एक वंशाचा दसऱ्याच्या दिवशी वाढदिवस असल्याने भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे. मागील सहा वर्षांपासून भगवान गडावर दसरा मेळावा होत नाही. दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली आहे ती परंपरा यंदा परत सुरू करणार आहे, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.

आता करुणा मुंडे यांनी मेळावा घेण्याची घोषणा केली असली तरी भगवान गडावर महंत नामदेवशास्त्री महाराज हे परवानगी देतात की नाही, हा मुद्दा आहे. कारण २०१५ मध्ये पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात दसरा मेळाव्यावरून वाद झाला होता. त्यावेळी राजकारणाचे जोडे बाजूला सारून गडावर या, अशा सज्जड सूचना महाराजांनी दिल्या होत्या. आता जर गोपीनाथ मुंडे यांच्या वारस असलेल्या पंकजा मुंडे यांना परवानगी दिली नाही तर मग आता दुसऱ्याला देणार का हा प्रश्न आहे.

दरम्यान, भगवान गडावर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे हे २२ वर्ष दसरा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही भगवान गडावर हजेरी लावलेली होती. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. मात्र, २०१६ मध्ये गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी मेळावा घेण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर पंकजा मुंडेंनी भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता. २०१७ मध्ये त्यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर दसऱ्याची परंपरा जपली होती, त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार मुलीला दुसरीकडे मेळावा घ्यावा लागला. आता करुणा मुंडे शर्मा यांना तिथे मेळावा घेता येईल का ? महंत परवानगी देतील का ? जर दिलीच तर त्यांच्या दसरा मेळाव्याला लोक येतील का ? याची चर्चा आता दसरा येईपर्यंत सुरूच राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

SCROLL FOR NEXT