Torrent Power 4300 MW hydropower project in Raigad saam tv
महाराष्ट्र

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

Torrent Power Project in Raigad Sparks Row: कर्जत - भीमाशंकर पट्ट्यात टोरंट पॉवर कंपनीसाठी 32 हजार झाडांची कत्तल होणार आहे... त्यामुळे ग्रामस्थ कसे आक्रमक झालेत... टोरंट पॉवर कंपनीला झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची परवानगी नेमकी कुणी दिली? राज्यात आधीच दुष्काळ असताना झाडांवर कुऱ्हाड नेमकी का चालवली जातेय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

कर्जत- भीमाशंकर पट्ट्यातील अंदाधुंद वृक्षतोडीमुळे पक्षी, वन्यजीव आणि कीटकांचा नैसर्गिक अधिवास नाहिसा होतोय... त्यात जंगलावर अवलंबून असलेले आदिवासी बांधव, स्थानिक जलस्रोत आणि पेज नदीच्या प्रवाहावर परिणाम होण्याची भीती आहे. वृक्षतोडीची संयुक्त पाहणी करून प्रशासनाने वस्तुस्थिती जाहीर करावी आणि पर्यावरणीय अटींचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून होऊ लागलीय...त्यामुळे आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. विकासाच्या नावाखाली निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी कर्जत ते भीमाशंकर पट्ट्यातील जंगलातल्या हजारो झाडांची कत्तल केली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला...नेमकं काय सुरू आहे या जंगलात ते पाहूयात..

मात्र टोरंट पॉवर प्रकल्प नेमका काय आहे? पाहूयात...

टोरंट पॉवरसाठी 32 हजार झाडांची कत्तल?

रायगडच्या कर्जतमध्ये टोरंट पॉवर कंपनीचा वीज प्रकल्प

टोरंट पॉवर 4300 मेगावॅटचा प्रकल्प उभारणार

प्रकल्पासाठी वनविभागाकडून 600 एकर जागा टोरंटला

150 एकर खाजगी जमीनही संपादित केली जाणार

32 हजारांहून अधिक झाडं तोडली जात असल्याचा आरोप

प्रकल्पामुळे अडीच लाखांहून अधिक झाडांना धोका

या प्रकल्पाला विरोध असतानाही ग्रामस्थांना विश्वास न घेता हजारो झाडांची कत्तल झाल्याचा आणि कंपनीकडून दबाव आणल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय...

दुसरीकडे सायडोंगरतील कत्तलीवरून आदित्य ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतलाय...कुणाच्या दबावाखाली या प्रकल्पाला परवानगी दिली असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय.

कर्जतमधील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा संताप

1. वृक्षतोडीची परवानगी वन विभागाने नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली?

2. महाराष्ट्राचा निसर्ग ओरबाडून खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा अजेंडा कधी थांबणार?

4. बिल्डर मित्र आणि मालकांचे खिसे भरताना महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, हे दिसत नाही का?

दुष्काळात जंगल कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न भाजप राजवटीनं हाती घेतला आहे!

दरम्यान केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं या प्रकल्पाला मंजूर दिली असून ठाकरेंनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असं विधान ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डिकरांनी केलयं....

कर्जत- भीमाशंकर पट्ट्यातील अंदाधुंद वृक्षतोडीमुळे पक्षी, वन्यजीव आणि कीटकांचा नैसर्गिक अधिवास नाहिसा होतोय... त्यात जंगलावर अवलंबून असलेले आदिवासी बांधव, स्थानिक जलस्रोत आणि पेज नदीच्या प्रवाहावर परिणाम होण्याची भीती आहे. वृक्षतोडीची संयुक्त पाहणी करून प्रशासनाने वस्तुस्थिती जाहीर करावी आणि पर्यावरणीय अटींचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून होऊ लागलीय...त्यामुळे आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाढत्या प्रदूषणाचा थेट मेंदूवर हल्ला; मुंबईकरांचा श्वास गुदमरला, काळजी घ्या

शिंदेच घेतायत 500 कोटींचा शोध, जरांगे आणि शिंदेचं नेतृत्व संपवण्याचा डाव-माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

Weather Update: 70 kmच्या वेगानं वाहणार सोसाट्याचा वारा, होणार धुव्वाधार पाऊस; 13 राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

सोन्याच्या किमतीचा 'पारा' घसरणार? सोनं आणखी स्वस्त होणार?

Maharashtra News Live Update: आमदार श्रीजया चव्हाण यांनी घेतली मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट

SCROLL FOR NEXT