Raigad Poladpur News google
महाराष्ट्र

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Raigad Poladpur News: रायगडच्या कांचनताई बुटाला यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले. 83 व्या वर्षीही त्यांची समाजसेवा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Sakshi Sunil Jadhav

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई बुटाला यांना ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2026’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. वयाच्या 83 व्या वर्षातही अखंडपणे समाजसेवा करत राहिलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव करत हा सन्मान देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रायगड आणि आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कांचनताईंचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या आयुष्यभराच्या समाजकार्यामुळे त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना मदत केली असून महिलांसाठी आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी मानले जाते.

कार्यक्रमाला ‘लागिर झालं जी’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते संतोष पाटील, आई फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोदराव मोरे, ‘आपली माती आपली माणसं’ संघटनेचे संस्थापक राज पार्टे, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकणचे अध्यक्ष शैलेश पालकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी कांचनताईंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जिद्दीला सलाम केला.

कांचनताई बुटाला यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजाच्या सेवेसाठी अर्पण केला आहे. वयोमानानुसार अडचणी येऊनही त्यांनी कधीच समाजकार्य थांबवले नाही. त्यांची कार्यतत्परता आणि समाजाप्रती असलेली निष्ठा ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

त्यांच्या या सन्मानामुळे पोलादपूरसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजसेवेची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा संदेशही या निमित्ताने देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहीणचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weight Loss: जिम न करता ३ महिन्यात करा वजन कमी रोज फॉलो करा ही ट्रिक

Weekly Horoscope: या राशींना मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

पहाटे अपघात! चालकाला झोप लागली अन् कार-टेम्पोची जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT