Kalyan Titwala News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण; टिटवाळा परिसरातील अजब प्रकार

Kalyan News : भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण; टिटवाळा परिसरातील अजब प्रकार

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून महापालिकेच्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामाची पोलखोल करण्यात आली. (Titwala) टिटवाळा परिसरात भर पावसात महापालिकेकडून रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम सुरू होतं. विशेष म्हणजे रस्त्यांवर पाणी साचलेलं असताना (Kalyan) देखील त्यावर डांबर टाकण्याचा प्रताप केला जात होता. (Breaking Marathi News)

कल्याण- डोंबिवली शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या महिनाभरापासून हे खड्डे भरण्याचे मागणी नागरिक करत आहेत. मात्र महापालिका प्रशासनाकडून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही रस्त्यांवरील खड्डे (KDMC) भरण्याची कामे पूर्ण झालेली नाही. महापालिकेकडून ही कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा करण्यात आला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात असल्याचे देखील सांगण्यात आलंय. प्रत्यक्षात मात्र रस्त्यांवरील कामाची  विदारक परिस्थिती समोर येत आहे. टिटवाळा परिसरात आज सकाळपासून रस्त्यांवरील खड्डे डांबराने भरण्याचं काम सुरू होतं. सकाळच्या सुमारास पाऊस सुरू झाला. 

टिटवाळा परिसरात सुरु असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होण्याआधी शिंदे गटाच्या पदाधिकारी (Shivsena) विजय दशेकर व इतर नागरिकांनी पाऊस सुरु आहे. डांबर टाकू नका अशी सूचना केली होती. मात्र त्यानंतरही हे काम सुरू करण्यात आले. याबाबत शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विजय दशेकर यांनी नाराजी व्यक्त केली. बेजबाबदार अधिकारी व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितलं होतं. अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे दिसून येतं आहे. महापालिका आयुक्त जबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करणार का असा सवाल आता देशेकर यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT