Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा ठिय्या

ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा ठिय्या

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : भाजप खासदार व कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. याबाबत काँग्रेसने (Congress) आक्रमक पवित्रा घेतला. यात (Kalyan) कल्याण येथे युवक कॉंग्रेसच्‍यावतीने आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. (Tajya Batmya)

ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आज युवक काँग्रेसने कल्याण छत्रपती शिवाजी चौक येथे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून भाजप सरकार विरोधात घोषणा करत निषेध नोंदवला. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल होऊन चार ते पाच महिने झाले आहेत. तरी देखील कारवाई नाही. या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाले आहे.

राजीनामा घेण्याची मागणी

खासदार सिंह यांच्‍यावर अद्याप कारवाई केली नसल्याने ब्रिजभूषण सिंह यांना अटक करून तात्काळ त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी कल्याण युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT