KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : गुणवत्ता तपासणी अधिकाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल; केडीएमसीत खळबळ

Kalyan News : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभागातील अधिकारी संजय सोमवंशी यांचा ठेकेदाराकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभागातील अधिकारी ठेकेदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ काँक्रीट रस्ता आणि गटाराच्या कामाच्या गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या पैशांचा असल्याची माहिती मिळत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण (Kalyan) डोंबिवली महापालिका क्षेत्रात विकासकामे नित्कृष्ट दर्जाची असल्याची ओरड होत असते. त्यातच आता कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभागातील अधिकारी संजय सोमवंशी यांचा ठेकेदाराकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कल्याण- डोंबिवली महापालिकेतील अधिकारी पैसे घेताना अनेकदा एबीसीच्या जाळ्यात सापडले आहेत. मात्र त्यानंतरही अधिकारी धडा घेत नसल्याचे दिसून येत नसून केडीएमसी (KDMC) आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

विभागाच्याच गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह 

महापालिकेच्या दक्षता गुण नियंत्रण विभागाकडून महापालिकेकडून सुरु असलेल्या रस्ते गटार पायवाटा आदी स्थापत्य स्वरुपाची कामे करताना गुणवत्ता राखली जात आहे की नाही याची तपासणी केली जाते. त्याठिकाणी असलेल्या प्रयोग शाळेतील साहित्याच्या आधारे सिमेंट, डांबर, रेती आदी साहित्य योग्य प्रतिचे आहे की नाही? याची तपासणी करुनच पुढील कामासाठी अनुमती दिली जाते. या विभागाचा अधिकारीच अशा प्रकारे पैसे घेत असल्याचा व्हीडीओ समोर आल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी व्हिडिओ पाहून शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही; असं महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT