Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : अनैतिक संबंधातून पुण्यात हत्या; दोघे संशयित आरोपी कल्याणमधून ताब्यात

Kalyan News : पिंपरी चिंचवड हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नर्सरीमध्ये काम करणारया प्रवीण महतो याची धारदार हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घडली होती.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : पुणे- हिंजवडी येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. हिंजवडी पोलिसांनी या फरार दोन आरोपींचा शोध सुरू केला असता बिहारला पळून जाण्याच्या तयारीला असलेल्या दोघांना कल्याण रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नर्सरीमध्ये काम करणारया प्रवीण महतो याची धारदार हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घडली होती. राजकुमार याला आपल्या पत्नीशी प्रवीणचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरुन राजू कुमार हा पुणे येथे राहणारा त्याचा मित्र धीरजकुमार याला भेटला. धीरज हा काही महिन्यापूर्वी प्रवीण सोबत नर्सरीत काम करीत होता. धीरज याने राजूकुमार याला बिहारहून बोलावून घेत दोघांनी मिळून प्रवीणची हत्या केल्याचे समोर (Crime News) आले आहे. यानंतर पुणे येथील वाडक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु होता. 

तपासादरम्यान प्रवीणची हत्या करणारे दोन संशयित कल्याणला असून तेथून बिहारला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. एसीपी सुनिल कुऱ्हाडे यांनी याबाबत मानपाडा पोलीस (Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांना माहिती दिली. यानंतर कादबाने यांनी पोलिस निरिक्षक राम चोपडे आणि प्रशांत आंधळे यांचे एक तपास पथक नेमले. पथकाने बुधवारी पहाटे सहा वाजता कल्याण स्टेशन परिसरात सापळा रचत शोध सुरू केला. पोलिसांनी सुरु घेत असताना फोटोत दिसणारे दोन संशयीत एका मेडिकल स्टोरवर दिसून आले. पोलिसांनी त्या दोघांना तत्काळ ताब्यात घेतले. राजू कुमार सिंग आणि धीरजकुमार सिंग असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. सध्या या दोघांना मानपाडा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुणे पोलीस पुढील तपास करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT