Bullock cart Race Pedgaon satara saam tv
महाराष्ट्र

Hind Kesari: कल्याणच्या हारण्या अन् रायफलची कमाल; जिंकला हिंद केसरीचा मान| Video

Bullock cart Race Pedgaon: पेडगाव येथे बैलगाडा शर्यत झाली होती. त्यात कल्याणच्या हरण्या आणि रायफल या बैलजोडीने हिंद केसरीचा पुरस्कार जिंकलाय. दोन हजार बैलजोडीतून प्रथम येत एक लाख रुपयांचे बक्षीस या हरण्या आणि रायफल नावाच्या बैलांना मिळाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

कल्याणच्या हारण्या अन् रायफलनं केली कमाल अन् उडवून दिली नुसती धमाल. नाद करा पण हरण्या अन् रायफलचा कुठं. एकदा पळाली का नुसती भिंगरी. जागेवर धुरळा. विरोधक गार. मालक सध्या या बैलजोडीवर फूल टू फिदा हाय... जोडीनं कारमानाच केलाय तसा हिंद केसरी जिंकायचा.

बघा की कशी हाय जोडी जय - वीरुची गुलालानं भरलेली. विजयाचा गुलाल पट्ट्यांनी सलग तिसऱ्यांदा उळधळलाय. दणक्यात हॅट्रीक. साताऱ्याचं मैदान कसं भरलंय पब्लिकनं एकदम टच. ती बी गुलीगत.आता हिकडं बघा डोंगरावर माणसं बसल्याती का माणसांचा डोंगर झालाय हीच कळना. फायनलची शिट्टी वाजली हरण्या अन् रायफल बुलेटच्या स्पीडनं सुसाट. सेकंदात त्या टोकाला अन् विजयाची माळ गळ्यात.

पट्यानं पहिल्यानंबरचं एक लाख रुपयाचं बक्षीस मालकाला जिंकवून दिलंय ती 2000 बैलातनं गड्याच्या गोठ्यात बक्षीसांचा ढीग लागलाय. एखाद्या खेळाडूच्या घरात असतू तसा. मालक हरण्या अन् रायफल वरुन जीव ववाळून टाकतूय. शेवटी बैल ही दौलतच असतीय उग कोण म्हणत नाय एक तर दावणीला असावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT