Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : तिकीट एजंट बनला विदेशी स्कॉचचा तस्कर; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, तिघेजण ताब्यात

Kalyan News : उल्हासनगरमधील डायमंड हॉलीडेज या कार्यालयात विमान आणि रेल्वे तिकिटांचे व्यवहार एजंट मार्फत करण्यात येत होते. अरुणकुमार पोपटानी असे एजंटचे नाव असून तो विदेशी दारूची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : तिकिटांचे व्यवहार करणारा एजंट चक्क दिल्लीहून परराज्यातून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉचची तस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. या एजंटच्या डायमंड हॉलीडेज ऑफिसवर कल्याण उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत हि कारवाई केली असून या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीनुसार उल्हासनगरमधील डायमंड हॉलीडेज या कार्यालयात विमान आणि रेल्वे तिकिटांचे व्यवहार एजंट मार्फत करण्यात येत होते. अरुणकुमार रामचंद्र पोपटानी असे या एजंटचे नाव असून तो विदेशी दारूची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहीतीच्या आधारे कल्याण राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने त्याच्या उल्हासनगरमधील कार्यालयात छापा टाकला.  

तीन ठिकाणी टाकण्यात आले छापे 

छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर पोपटानीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या राहत्या घरात, इमारतीच्या पंप हाऊस आणि अंबरनाथमधील आणेगाव येथे छापे टाकण्यात आले. याठिकाणी त्याचे साथीदार सुरज श्रीकौशल शुक्ला व दिपक राजकुमार नंनकानी सुद्धा मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठवून ठेवत होते. या तिन्ही ठिकाणांहून एकूण ३५२ स्कॉचच्या सिलबंद बाटल्या विविध ब्रॅन्ड्ससह जप्त करण्यात आल्या. 

तिघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल 

दरम्यान या कारवाईत स्कॉचच्या बाटल्यांसह दोन वाहने असा एकूण १८ लाख ६३ हजार ४४९ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर आरोपींविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब आणि त्यांच्या चमूने केली. या तिघांनाही न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

Tuesday Horoscope: पैशाच्या समस्या दूर होणार, या ५ राशींना घ्यावी लागणार काळजी? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला तुम्ही पाहिलाय का? अनेक पर्यटकांच्या नजरेआड आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Accident News: बेंगळुरूहून मुंबईकडे निघाली ट्रॅव्हल्स बस, साताऱ्यात ड्रायव्हर बदलला; सारोळे उड्डाणपुलाजवळ येताच मोठा अपघात

Maharashtra News Live Update: करडे घाटात गोळीबार; सराईत गुन्हेगार विशाल काळेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT