Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: प्लॅटफॉर्मवर गाढ झोपेतील प्रवाशाचे मोबाईल, दागिन्‍यांची चोरी; चोरटा सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

प्लॅटफॉर्मवर गाढ झोपेतील प्रवाशाचे मोबाईल, दागिन्‍यांची चोरी; चोरटा सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : बदलापूर रेल्वे स्थानकावर गाढ झोपलेल्या प्रवाशाची मोबाईल रोकड व सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला होता. या चोरट्याला (Kalyan) कल्याण गुन्हे लोहमार्ग पोलीसानी (Railway Police) बेड्या ठोकल्या. अनिल मासवकर असे चोरट्याचे नाव असून तो सराईत चोरटा असल्याचे समोर आले आहे. (Breaking Marathi News)

तक्रारदार प्रवासी बदलापूर रेल्वे स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर १० फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास थकवा आल्याने झोपला होता. त्याला गाढ झोप लागली होती. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्याच्या जवळील मोबाईल, रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरट्याकडून दागिने, रक्‍कम हस्‍तगत

या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा देखील करत होती. या चोरट्याचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली स्टेशनचे सीसीटीव्ही तपासले. या चोरट्याची ओळख पटवून त्याला डोंबिवली येथून ताब्यात घेण्यात आले. अनिल मासवकर असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

Maharashtra Live News Update: दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल

RSS @100 years : मीनाक्षीपुरम ते रामजन्मभूमी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी प्रवास, समाजामुळे यशस्वी वाटचाल

Dussehra 2025: रावण दहनाची राख घरात ठेवण्याचे खास उपाय, मिळेल धनलाभ आणि यश

Pune Crime: निलेश घायवळ अन् टोळीला पोलिसांचा मोठा दणका; १० बँक खाती गोठवली, प्रॉपर्टीसुद्धा सील

SCROLL FOR NEXT