Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: चोरीच्‍या गुन्‍ह्यातून सुटला; लोकल ट्रेनमधून प्रवास करताना केला पुन्‍हा प्रताप

चोरीच्‍या गुन्‍ह्यातून सुटला; लोकल ट्रेनमधून प्रवास करताना केला पुन्‍हा प्रताप

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली रेल्वे पोलिसानी (Railway Police) सापळा रचत अटक केली. विशेष म्हणजे आपली ओळख (Dombivili) लपविण्यासाठी त्याने टक्कल केले होते. त्यानंतरही तो पोलिसांच्या तावडीत सापडला. (Breaking Marathi News)

ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याची ओळख पटली. आरोपी ठाणे रेल्वे (Railway) स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचत त्याला अटक केली. पवनकुमार निषाद असे या चोरट्याचं नाव आहे.

शिक्षा भोगून सुटला अन्‌

पवनकुमार निषाद असे या चोरट्याचे नाव असून त्याच्या विरोधात याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत. एका चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून पवन सप्टेंबर महिन्यात जेलबाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा चोऱ्या करणे सुरू केले. पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १२ नोंव्हेंबरला पुण्यात रोड शो

Winter Health Tips: हिवाळ्यात 'या' लाडूचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Jalna News : जालना जिल्ह्यात १३ तडीपार, ८८९ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई

Maharashtra Election: मी शिवसेना चोरताना तुम्ही झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Vidhan Sabha Election : संभाजीनगर, जळगावमध्ये सापडली मोठी रक्कम; पोलिसांकडून रक्कमेबाबत तपास सुरु

SCROLL FOR NEXT