Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: शीतल म्हात्रे प्रकरण..कल्याणहून ठाकरे गटाचा कार्यकर्ता ताब्‍यात

शीतल म्हात्रे प्रकरण..कल्याणहून ठाकरे गटाचा कार्यकर्ता ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : शितल म्हात्रे व्हिडियो प्रकरणात दहिसर पोलिसांनी कल्याण (Kalyan News) तिसगाव परिसरातून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले. विनायक डायरे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विनायक डायरे याच्या घरी शिंदे गटाच्‍या (Shiv Sena) शिवसेनेचे तीन कार्यकर्ते आले व त्यांनी विनायक डायरे व त्याच्या कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप डायरे यांच्या कुटुंबाने केला. (Maharashtra News)

डायरे कुटुंबाने याबाबत आज कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी धमकी देणाऱ्यांची नावे सांगत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र नाव सांगून पण पोलीस अज्ञाता विरोधात तक्रार घेत असल्याचा आरोप डायरे कुटुंबांनी केला आहे.

ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा ठिय्या

या विरोधात मध्यरात्रीच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस (Police) ठाण्यात ठाण मांडून ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. घरात घुसून धमकावणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT