Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan RTO : 'ऑन ड्युटी केडीएमसी' लिहलेले डंपरवर आरटीओची कारवाई; सव्वा लाखांचा दंड वसूल

Kalyan News : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम, घनकचरा यासारख्या विभागात अनेकदा ठेकेदारी पद्धतीने वाहने भाडेतत्वावर घेतली जातात. ही वाहने अनेकदा सुस्थितीत नसल्याने अपघात घडत असतात

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: केडीएमसीच्या काँट्रॅक्टवरील कचऱ्याचे डंपर, ट्रक मुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आरटीओकडून पालिकेच्या विविध विभागात काँट्रॅक्टवर असलेले ट्रक, डंपरसह चालकांची तपासणी सुरू केली आहे. यात आज दिवसभरात १५ ट्रक व डंपरवर कारवाई करण्यात आली असून सव्वा लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. शिवाय केडीएमसीला नोटीस बजावण्यात आली आहे. 

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम, घनकचरा यासारख्या विभागात अनेकदा ठेकेदारी पद्धतीने वाहने भाडेतत्वावर घेतली जातात. ही वाहने अनेकदा सुस्थितीत नसल्याने अपघात घडत असतात. तर या वाहनांच्या कागद पत्राकडे देखील दुर्लक्ष करण्यात येते. चालकाचे लायसन्स देखील तपासले जात नाही. गेल्या आठवडाभरात अशाच दोन ट्रकच्या अपघातात महिलेसह तिच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी सात ते आठ गाड्यांचे नुकसान झाले. 

केडीएमसीच्या १५ वाहनांवर कारवाई  

दरम्यान या वाहनावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड्युटीवर असे लिहिलेले असल्याने महापालिकेच्या वापरात असलेली वाहने आरटीओच्या रडारवर आली आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या वाहनाचा वेग, चालकाची आय डिटेक्टर चाचणी, वाहनाच्या कागदपत्राची तपासणी सुरु केली आहे. यात ज्या कागदपत्राची पूर्तता नाही; अशा १५ वाहनावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. 

केडीएमसीला आरटीओचे पत्र 

आरटीओने कारवाई केलेल्या १५ वाहनांवर तब्बल १ लाख २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबत आरटीओचे अधिकारी प्रशांत देवणे यांनी गेल्या आठवडाभरात १५ ट्रक व डंपरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. तसेच केडीएमसीने देखील या वाहनांच्या कागदपत्रांची, वाहन चालकाच्या लायसन्सची तपासणी करावी; असे पत्र केडीएमसीला पाठवणार असल्याची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT