Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : आता राष्ट्रवादी दहशतवादी मुक्त झाली; प्रमोद हिंदुराव यांचा जितेंद्र आव्हाड यांना अप्रत्यक्ष टोला

आता राष्ट्रवादी दहशतवादी मुक्त झाली; प्रमोद हिंदुराव यांचा जितेंद्र आव्हाड यांना अप्रत्यक्ष टोला

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस दहशतवादी मुक्त झाली आहे, जे जायला घाबरत होते. आता हिम्मत करतायत, तेही (Kalyan) आमचेच आहेत. तेही सगळे येतील त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचल्याशिवाय राहणार नाही; असा टोला अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना नाव न घेता लगावला आहे. (Tajya Batmya)

शहरातील विविध विकास कामाबद्दल चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दहशतवादी मुक्त राष्ट्रवादी काँग्रेस झाली आहे. हे सगळेच (NCP) कार्यकर्ते बोलतायत. लोक त्या ठिकाणी जायला घाबरत होते. आता लोकं हिंमत करतायत, तेही सगळे येतील त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचल्याशिवाय राहणार नाही असा टोला नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना लगावला. या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांचे कल्याण डोंबिवली महापालिकेतील चारही नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत आहेत. येत्या काळात अजित पवार यांच्या माध्यमातून शहरांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं.

पत्रकारांनी अजित पवार यांनी जितेंद्र आव्‍हाड यांना तर आरोप केले होते. जितेंद्र आव्हाड यांचा त्रास होता का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी कुणामुळे कोण सोडून गेले याच्यापेक्षा आमच्यामुळे कोण जोडले जात असेल तर तो जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं टाकण्यापेक्षा आम्ही आता सक्षम आहोत, आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. जे आमच्या सोबत येतील त्यांना आमच्या सोबत पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्‍याचे हिंदूराव यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रामकुंडावर ठाकरे सेनेचं आंदोलन

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

जिम-डाएटिंगचा खर्च वाचेल! दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचे निधन, महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा

SCROLL FOR NEXT