Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : पलावा- काटई उड्डाणपूल मे अखेरीस होणार खुला; वाहतूक कोंडीपासून होणार सुटका

Kalyan News : दिवा- पनवेल रेल्वेमार्गावरील या उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान गुरुवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- शीळ रोडवरील पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन येत्या मेपासून प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. सदरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याने येथून लाखो वाहन धारकांना वाहतूक कोंडीपासून होणार त्रास कमी होणार आहे. मी अखेरीला हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे . 

दिवा- पनवेल रेल्वेमार्गावरील या उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान गुरुवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली असून मे अखेरीस सर्व काम पूर्ण करून दोन लेन सार्वजनिक वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.

कल्याण- शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार 

दोन्ही नव्या लेन सुरू झाल्यास पलावा जंक्शन परिसरात सहा लेनवरून वाहतूक सुरळीत होणार आहे. दरम्यान, आणखी दोन लेनचे काम सुरूच राहणार असून, त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या पुलामुळे कल्याण- शिळ मार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

वाहनधारकांना मिळणार दिलासा 

पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन येत्या मेपासून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने उड्डाणपुलाच्या लेन उभारणीचेकाम गतीने सुरु आहे. अर्थात या लेन कार्यान्वित झाल्यास कल्याण, ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्य म्हणजे येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी देखील थांबणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT