Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : लोकल ट्रेनमध्ये सापडलेल्या २० लाख रकमेचा मालक आला समोर; पोलिसांनी मागविला तपशील

Kalyan News : कसारा सीएसटी लोकलमध्ये आसनगावजवळ डब्यात सापडलेल्या या बॅगेत २० लाख रुपयांची रोकड होती. ही रोकड ताब्यात घेत पोलिसांनी पैसे जप्त

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : मागील आठवड्यात लोकल ट्रेनमध्ये २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग सापडली होती. इतकी मोठी रक्कम कोणाची याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांकडून शोध सुरु होता. दरम्यान या २० लाख रुपयांच्या रोकडचा मालक आता पोलिसांसमोर आला आहे. मात्र कल्याण रेल्वे पोलिसांनी सदरच्या रकमेचा तपशील मागविला असून त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील तपास सुरु केला आहे. 

कल्याण (Kalyan News) रेल्वे पोलिसांकडे मागील आठवड्यात काही प्रवाशांनी एक बेवारस बॅग आणून दिली. कसारा सीएसटी लोकलमध्ये आसनगावजवळ डब्यात सापडलेल्या या बॅगेत २० लाख रुपयांची रोकड होती. ही रोकड ताब्यात घेत पोलिसांनी पैसे जप्त करुन त्याचा पुढील तपास सुरु केला होता. कल्याण रेल्वे पोलिस (Railway Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी ही रोकड कुणाची आहे? याचा शोध घेण्यासाठी तीन पथके नेमली. स्टेशन परीसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान मुंब्रा येथे राहणाऱ्या एका इसमाने हे पैसे आपले असल्याचा दावा केला.

मात्र पोलिसांनी या रकमेबाबत तपशील व इतर माहिती घेऊन येण्यास सांगितले, त्यानंतर हा इसम परतला नाही. त्यानंतर सचिन बोरसे नावाचा इसम पुढे आला. बोरसे हे धुळ्यातील राहणारे असून ते ठेकेदार आहेत. त्याचे कुटुंबिय मुंबई येथील चर्चगेट परिसरात राहतात. सचिन बोरसे यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागणार असल्याने पैसे घेऊन मुंबईला येत होते. कसाराहून त्यांनी कल्याणसाठी लोकल ट्रेन पकडली. आसनगाव रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्यांना झाेप लागली. याच वेळी काही तरुण गाडीत चढले. संशय आल्याने यामधील एका तरुणाने बॅग कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून घेतली. त्यामध्ये पैसे दिसल्याने त्याने ती पोलिसात जमा केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. कल्याण रेल्वे पोलिसांनी सचिन बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे या संदर्भातील प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आत्ता कल्याण रेल्वे पोलिस करीत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी, जिल्हा परिषद वादावर कसा पडला पडदा?

Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

Masala Kairi Recipe: जिभेचे चोचले पुरवणारी चटपटीत मसाला कैरी घरी कशी बनवायची?

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

SCROLL FOR NEXT