Kalyan MNS Saam tv
महाराष्ट्र

Kalyan MNS : केडीएमसीने नसलेले डिव्हायडर रंगवत काढले लाखोंचे बिल; मनसेचा आरोप, रंगाच्या बादल्या ब्रश घेऊन आंदोलन

Kalyan News : स्टेशन ते गुरुदेव चौकासह, संतोषी माता रोड आणि काही ठिकाणचे फुटपाथ डिव्हायडर रंगवणे व धुण्याचे तब्बल ४० लाखांचे बिल कल्याण- डोंबिवली महापालिकेने काढल्याचा आरोप मनसेने केला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: केडीएमसीने मुरबाड रोड ते गुरुदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर धुणे व रंगवण्याच्या कामाचे बिल ठेकेदाराला दिली आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली. मात्र प्रत्यक्षात स्टेशन परिसरात डिव्हायडर नसताना ही बिल महापालिकेने दिली कशी? असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. याविरोधात मनसेने रंगाच्या बादल्या ब्रश घेऊन आंदोलन केले आहे. 

कल्याण- डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आला. कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकासह, संतोषी माता रोड आणि काही ठिकाणचे फुटपाथ डिव्हायडर रंगवणे व धुण्याचे तब्बल ४० लाखांचे बिल कल्याण- डोंबिवली महापालिकेने काढल्याचा आरोप मनसेने केला. माहितीच्या अधिकारात मनसे कार्यकर्त्यांनी ही माहिती उघड केली आहे. यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात आज मनसेने प्रतिकात्मक आंदोलन केलं.  

प्रतीकात्मक फुटपाथ, डिव्हायडर रंगवत आंदोलन  

मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी मिस्टर इंडियाचे लाल रंगाच्या चष्मे घातले होते. तसेच हातात बादल्या व रंगाचा ब्रश घेऊन प्रतिकात्मक फूटपाथ डिव्हायडर रंगवत टीडीएमसी व केडीएमसी अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकापर्यंत डिव्हायडरच नाही; तर मग हे डिव्हायडर रंगवण्याचे धुण्याचे बिल काढले कसे? असा सवाल केला आहे. 

भ्रष्ट्र अधिकारी, ठेकेदारांवर कारवाईची मागणी 

तसेच इतर ठिकाणच्या देखील फुटपाथ आणि डिव्हायडर रंगवण्याचे काम एमसीएचआय या बिल्डराच्या संघटनेला दिले आहे. तो खर्च ती संघटना करणार आहे. त्याचा महापालिकेचा बिलाशी काही संबंध नाही, मग त्यांचे बिल देखील केडीएमसीने काढले कसे? असा सवाल केला. महापालिका अधिकारी स्वतःची तिजोरी भरत आहेत. केडीएमसी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई केली नाही; तर मनसे अशा अधिकाऱ्यांना ठोकणार असा इशारा दिला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT