Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : सात लाख किमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत; चार जणांना अटक

Kalyan News : सात लाख किमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत; चार जणांना अटक

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याणच्या कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपीना (Police) पोलिसांनी अटक केली आहे. तर (Kalyan) कल्याणजवळ आंबिवली इराणी वस्तीमधून एका महिला ड्रग्स तस्करला देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले. (Maharashtra News)

कल्याण- डोंबिवली परिसरात अनेक गुन्ह्यामधील आरोपी नशेखोर असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर सचिन गुंजाळ, एसीपी कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कोळशेवाडी (Dombivali) पोलीस व खडकपाडा पोलिसांनी ड्रग्स तस्करांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कल्याण पूर्वेकडील शंभर फुटी रोड येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान एका रिक्षामध्ये दोघजण संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांना बघून या रिक्षा चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करत ऑटो रिक्षा ताब्यात घेत सुनील यादव व युवराज गुप्ता या दोन जणांची झडती घेतली. या दोघांजवळ एम डी ड्रग्स आढळून आले. 

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता या दोघांनी नवी मुंबई येथील एका नायजेरियन नागरिक चुकवूइमेका इमेका हा एमडी ड्रग्स विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नवी मुंबई येथे सापळा या नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड ठोकल्या. या तिघांकडून एकूण पावणे सहा लाख किमतीचे सुमारे २८५ ग्रॅम ड्रग्स जप्त केले. यानंतर खडकपाडा पोलिसांचे पथक कल्याणजवळील आंबिवली इराणी वस्ती परिसरात गस्त घालत असताना एक इराणी महिला संशयस्पद फिरताना आढळून आली. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत झडती घेतली असता तिच्याकडे सुमारे ६६ हजार रुपये किमतीचे ३४ ग्राम वजनाचे एमडी ड्रग्स आढळून आले. फिजा इराणी असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी फिजा इराणी हिला बेड्या ठोकल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT