Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून उमेदवारी; महेश गायकवाड यांचा भाजपला टोला

Kalyan News : कल्याण पूर्व मतदार संघात भाजपा उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना शहर प्रमुख यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून रणशिंग फुंकले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्व मतदार संघात महायुतीत आज बंडाची ठिणगी पडली आहे. महायुतीकडून भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कल्याण पूर्वेत ज्यांनी भ्रष्टाचार केला. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला; अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून उमेदवारी दिल्याचा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला. 

कल्याण पूर्व मतदार संघात भाजपा उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात (Shiv Sena) शिवसेना शहर प्रमुख यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून रणशिंग फुंकले आहे. यावेळी बोलताना महेश गायकवाड यांनी गेल्या पंधरा वर्षात कल्याण पूर्वेत विकास झालेला नाही नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ही लढाई आहे. (Kalyan News) कल्याण पूर्व येथील जनतेने ही निवडणूक सामान्य माणसाच्यावतीने लढण्यास सांगितले म्हणून लढत असल्याचे स्पष्ट केले. 

वरिष्ठांनी सांगितलं युतीचा धर्म पाळा. मात्र खासदार श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत होते. तेव्हा ते जिंकणार होतेच, मात्र आजचा उमेदवार या उबाठा उमेदवाराच्या गळाभेट करत होत्या. त्यांचा सर्रास प्रचार करत होत्या. त्यामुळे त्यांनी आम्हाला बंडखोरीची भाषा आणि कोणती भाषा शिकवू नये असा टोला लगावला. तसेच माझ्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, भाजपच्या पदाधिकारी नगरसेवक देखील असल्याचे महेश गायकवाड यांनी सांगितले. महेश गायकवाड यांच्या रॅलीत आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील, सुशीला माळी यांच्यासह काही पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Chopda Vidhan Sabha : चोपड्यात ठाकरे गटाने बदलला उमेदवार; प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी

Manoj Jarange : मनोज जरांगे स्वत: विधानसभा लढवणार? केलं मोठं वक्तव्य, पाहा Video

Ajit Pawar: एकच ध्यास बारामतीचा सर्वांगीण विकास; अजित पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ

Maharashtra Election : ऐन विधानसभेत ठाकरे गटाला मोठा धक्का; लढण्याआधीच एक जागा गेल्यात जमा?

SCROLL FOR NEXT