KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : खड्डे भरण्याच्या कामात हलगर्जीपणा; आयुक्तांनी ठोठावला पन्नास हजार रुपयांचा दंड

Kalyan News खड्डे भरण्याच्या कामात हलगर्जीपणा; आयुक्तांनी ठोठावला पन्नास हजार रुपयांचा दंड

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: सूचनांचे पालन न करणाऱ्या व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा (Kalyan) सज्जड दम महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिला. खड्डे भरण्याच्या कामांची आज महापालिका आयुक्त दांगडे यांनी पाहणी केली. या पाहणी दौरा दरम्यान ठेकेदारांना (KDMC) वेळेत काम पूर्ण करण्याची ताकीद दिली. यावेळी दुर्गाडी किल्ला परिसरात खड्डे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर केडीएमसीचा लोगो न आढळल्याने आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला ५० हजाराचा दंड ठोठावला. (Latest Marathi News)

यंदाच्या पावसाळ्यात कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यांवर पडलेला खड्ड्यामुळे महापालिकेवर चारी बाजूंनी टीका झाली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेकडून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली. आज महापालिका आयुक्तांनी या कामांचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्या दरम्यान आयुक्तांनी ठेकेदारांना खड्डे भरण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची ताकीद दिली. तसेच खड्डे भरण्याच्या कामासंदर्भात ठेकेदाराला करण्यात आलेला सूचनांचे त्यांनी तंतोतंत पालन करावे; अन्यथा ठेकेदारावर दंडात्मक कारवाई येईल असा इशारा देखील यावेळी महापालिका आयुक्तांनी दिला. 

महापालिका क्षेत्रामध्ये एमएसआरडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी विभागाअंतर्गत असलेल्या रस्त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत त्यांना रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश दिल्याचे देखील आयुक्तानी सांगितले. अनेकदा पाईपलाईन टाकण्यासाठी व विविध वाहिन्या टाकण्यासाठी विविध यंत्रनांकडून रस्ते खोदले जातात. ही कामे एकाच वेळेस होतील या दृष्टिकोनातून या कामाचे नियोजन शहर अभियंता विभागाने करावा असा सूचना देण्यात आल्याचे आयुक्त दांगडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT