KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : बिल्डरांना केडीएमसीचा दणका; २५ बिल्डरांना पाठवल्या नोटिस ,एका बिल्डरचे बांधकाम बंद

kalyan News : मुंबईसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात हवेची गूणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने मुंबई महापलिकेस फटकारले होते

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : प्रदूषणामुळे कल्याण- डोंबिवली शहरातील हवेची गुणवत्ता खालवली असल्याने ज्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी (Kalyan) धूळ निर्माण होते. याला कारणीभूत असलेल्या २५ बिल्डरांना नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर (KDMC) महापालिका मुख्यालयापासून नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील साई कृष्णा या बांधकाम साइटचे काम बंद केले. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी पदभार स्वीकारताच प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली असून त्यांनी बिल्डरांना चांगलाच दणका दिला आहे. (Tajya Batmya)

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात हवेची गूणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने मुंबई महापलिकेस फटकारले होते. न्यायालयाने फटकारल्यानंतर विविध महापालिकांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेतल्या. ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवती किमान ३५ फुट उंच पत्रे उभारले पाहिजेत. बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना हिरव्या कापड, ज्यूट शीट, ताडपत्रीने चारही बाजूंनी बंदिस्त करावे. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग करताना वॉटर फॉगिंग केले जाईल, याची खात्री करावी. त्याठिकाणीची पाहणी करण्याकरीता पथके नेमली होती. ज्या ठिकाणी अंमलबजावणी केली जात नाही. त्याठिकाणची व्हिडीओग्राफी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

न्यायालयाच्या या आदेशानुसार महापालिकेने पाहणी केली. या पार्श्वभूमीवर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २५ बिल्डरांना केडीएमसीतर्फे नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या मुख्यालयापासून नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील साई कृष्णा या बांधका साइटचे बांधकाम बंद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT