Kalyan News Traffic police Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी हाती फावडे, घमेली; खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार

वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी हाती फावडे, घमेली; खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याणमधील वरदळीच्‍या रस्‍त्‍यावर खड्डे पडले आहेत. यामुळे अनेकदा वाहतुक कोंडी होत असते. याचा त्रास (Kalyan) वाहनधारकांना होत असतो. मुळात महापालिकेने खड्डे बुजविण्याचा दावा केला असताना खड्डे आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी (Traffic Police) वाहतुक पोलिसांनीच पुढाकार घेतला. (Maharashtra News)

कल्याण डोंबिवली शहरात काही रस्ते एमएसआरडीसी अंतर्गत येतात. तर बहुतेक रस्ते महापालिकेच्या अखत्यारित आहेत. पावसाळा आला की कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचा दावा महापालिका (KDMC) तसेच संबंधित विभागाकडून करण्यात आला असला तरी परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येते. या त्रासातून काही प्रमाणात सुटका व्हावी; यासाठी वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

फावडे, घमेली घेऊन उतरले रस्‍त्‍यावर

वाहतूक पोलिसांनी जेसीबी, हातात फावडे आणि घमेली घेऊन कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले. २४ तास वर्दळीच्या असलेल्या या चौकात वाहतूक कोंडी झाल्यास वाहणांच्या लांबचलांब रांगा लागतात. या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत हे खड्डे बुजवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात मोठे फेरबदल; एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसराला दिलासा

रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, हे 5 आजार दूर होतील

विकृतीचा कळस! ६० वर्षीय नराधमांचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; कल्याण हादरलं

SCROLL FOR NEXT