Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : महाविकास आघाडीत बंडखोरी; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांची अपक्ष उमेदवारी

Kalyan News : कल्याण पूर्व मतदारसंघातून आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्व मतदारसंघात महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला असताना महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने कल्याण पूर्व मतदारसंघावर दावा केला होता. मात्र महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला ही जागा गेल्याने काँग्रेस पदाधिकारी नाराज होते. यामुळे येथे बंडखोरी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

कल्याण (Kalyan News) पूर्व मतदारसंघातून आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना सचिन पोटे यांनी सांगितले, कि अनेक महिन्यांपासून कल्याण पूर्व मतदारसंघ हा काँग्रेसला सोडावा; अशी मागणी महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aaghadi) करत होतो. मात्र ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली. यामुळे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत असल्याचे पोटे यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत बंडाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. 

काँग्रेसने वाऱ्यावर सोडले 

काँग्रेसची कल्याण पूर्व मतदारसंघात ताकद आहे. प्रत्यक्षात ही जागा भाजपची होती. भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या समोर शिवसेनेचे उमेदवार तीन वेळा पराभूत झाले होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तसं न झाल्याने आज अपक्ष अर्ज दाखल केला, मी काँग्रेसला नव्हे तर काँग्रेसने मला वाऱ्यावर सोडल्याचे देखील सचिन पोटे यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT