Kalyan Railway Station Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Railway Station : लोकलची वाट बघणाऱ्या महिला प्रवासीची छेड; आरोपीला रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

Kalyan News : डोंबिवलीत राहणारी प्रवासी महिला डोंबिवलीहून कल्याणला कामानिमित्त आली होती. ही महिला प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट बघत असताना एका इसमाने तिला धक्का दिला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट बघत उभ्या असलेल्या एका महिला प्रवाशीची छेड काढण्याचा प्रकार घडला. सदरची खबर (Railway Police) रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर छेड काढणाऱ्या आरोपीला (Kalyan) कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रोहित वरकुटे असे या आरोपीचे नाव असून तो कसारा येथील राहणार आहे. (Latest Marathi News)

कल्याण रेल्वे स्थानकात गर्दी असते. या स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा करतात. डोंबिवलीत राहणारी प्रवासी महिला डोंबिवलीहून कल्याणला कामानिमित्त आली होती. ही महिला प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट बघत असताना एका इसमाने तिला धक्का दिला. चुकून धक्का लागला असेल असं महिलेला वाटलं. तिने स्वतःला सावरून तीन नंबरच्या फलाटावरुन सात नंबरच्या फलाटावर गेली. त्या फलाटावरही तोच व्यक्ती तिचा पाठलाग करीत आला. तिने पुन्हा तिच्यासोबत तोच प्रकार केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संशयिताला पोलीस कोठडी 

प्रवाशांच्या मदतीने फलाटावर असलेल्या पोलिसानी या व्यक्तीला पकडले. रोहित वरकुटे असे या व्यक्तीचे नाव असून तो कसारा येथे राहतो. कल्याण रेल्वे पोलिसांनी रोहितच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रोहितला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता रोहितला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण, साक्षीदाराच्या भावाला धमकी

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT