Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : कल्याण डीसीपी स्कॉडची मोठी कारवाई; सात लाखांचा गुटखा जप्त, एकाला घेतले ताब्यात

Kalyan News : तिघा गुटखा माफियापैकी जहांगीर शेख याला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघेजण फरार झाले आहेत.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणच्या भानू सागर परिसरात गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण डीसीपी स्कॉडने एका गोडावूनवर छापा टाकत गुटखा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याठिकाणाहून तब्बल ६ लाख ६८ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. 

कल्याणच्या पश्चिमेतील भानू सागर परिसरात असलेल्या गुटखा गोडावून बाबत डीपीसी स्कॉड आणि कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मिळून एका गोडावूनवर छापा टाकला. या छापेमारीत गोदामात जवळपास सात लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांची हि मोठी कारवाई मानली जात आहे. 

दरम्यान पोलिसांनी छापेमारी करत तब्बल ६ लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून या कारवाईनंतर गुटखा माफिया जहांगीर शेख, जिशान खान आणि मुनावर खान या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघा गुटखा माफियापैकी जहांगीर शेख याला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघेजण फरार झाले आहेत. 

यातील मुनावर खान हा या रॅकेटचा म्होरक्या असून सदरचा गुटखा कल्याण स्टेशन परिसरातील टपऱ्यावर पुरविला जात असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. तर दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी हा गुटख्याचा धंदा सुरु आहे. मात्र डीसीपी कार्यलयात राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री सरकारी रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू, ६ गंभीर, ३६ चिमुकल्यांना वाचवले

Medicine Storage Tips : घरात 'या' ७ ठिकाणी कधीच गोळ्या-औषधं ठेवू नका! कारण जाणून घ्या

Monday Horoscope : शंकराची कृपा राहील! 5 राशींची भरभराट होणार, पैसा खर्च करताना काळजी घ्या; वाचा सोमवारचे राशीभविष्य

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT