Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी बनवाबनवी; बनावट कागदपत्र करत लाटले चार लाख रुपये; कल्याणमधील खाजगी रुग्णालयाचा प्रताप

Kalyan News : आंबिवली परिसरात गणपती मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहे. या रुग्णालयात २६ मे ते १० जुलै २०२३ या कालावधीत रुग्णालयाने १३ रुग्णांवर शस्त्रक्रिया व औषध उपचार केल्याबाबतचे बनावट कागदपत्र तयार केले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण जवळील मोहन येथील खाजगी रुग्णालयाचा एक प्रताप समोर आला आहे. गणपती मल्टीस्पेशालिटी या रुग्णालय प्रशासनाने तब्बल १३ रुग्णाच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचाराची बनावट कागदपत्र तयार करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चार लाख ७५ हजार रुपये उकळले आहेत. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

कल्याण जवळील मोहने आंबिवली परिसरात गणपती मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहे. या रुग्णालयात २६ मे ते १० जुलै २०२३ या कालावधीत रुग्णालयाने १३ रुग्णांवर शस्त्रक्रिया व औषध उपचार केल्याबाबतचे बनावट कागदपत्र तयार करून मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षाला सादर करत रक्कम मिळण्याबाबत प्रस्ताव दिली. त्यानुसार कार्यालयाकडून त्या संबंधीची प्रक्रिया देखील करण्यात आली. 

रुग्णालयाच्या खात्यावर रक्कम वर्ग 

सदरचा प्रस्ताव वैद्यकीय मदत कक्षाकडे दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने गणपती मल्टी स्पेशलिटी रुग्णालयाच्या बँक खात्यांवर १३ रुग्णांच्या उपचाराचे चार लाख ७५ हजार रुपयांचे रक्कम वर्ग केले. दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातील अंतर्गत छाननी दरम्यान रुग्णालयाने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत शंका आली. यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी केली असता ही कागदपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. 

फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल 

या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर या प्रकरणी पोलिसांनी गणपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. अनुदुर्ग ढोनी, प्रदीप पाटील, ईश्वर पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी पुढील तपास करत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT