Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : चार बांग्लादेशीना कल्याण पूर्वमधून घेतले ताब्यात; दोन महिलांचाही समावेश

Kalyan News : कल्याण पूर्वमधील पिसवली येथे एका चाळीत राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. या मध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : कल्याण पूर्व पिसवली परिसरात चार घुसखोर बांगलादेशी राहत असल्याची माहिती बॉर्डर सेक्युरिटी फोर्सने डोंबिवली मानपाडा पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी शोध सुरू करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

कल्याण (Kalyan News) पूर्वमधील पिसवली येथे एका चाळीत राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. या मध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. लकी शेख, मोहम्मद शाबीर हुसेन, रुकसाना शेख, तौफिर शेख असे ताब्यात घेतलेल्या चार जणांची नाव आहेत. अटक करण्यात आलेल्या पैकी माेहम्मद शाबीर शेख हा बांगलादेशातून भारतात येत असताना त्याला सिमा सुरक्षा सैनिकांनी अटक केली होती. काही दिवसांनी तो पुन्हा बेकायदेशीरपणे लपून भारतात आला. त्याच्या अटकेची नोंद बीएसएफ जवानांकडे होती. तो पुन्हा भारतात आला असल्याच्या संशयावरुन बीएसएफ जवानांनी डोंबिवली (Manpada Police) मानपाडा पोलिसाना सूचना केली. 

परिसरात करायचे मोलमजुरी 

मोहम्मद हा मार्च २०२४ मध्ये डोंबिवलीत आला होता. गेल्या आठ महिन्यापासून तो त्याच्या नातेवाईकांसह पिसवली परिसरात राहत होता. पोलिसांना बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने आणि पोलिस निरिक्षक राम चोपडे यांच्या पथकाने पिसवली गाठली. पोलिसांनी पिसवली परिसरात राहणाऱ्या मोहम्मद शाबीर शेख याच्यासह अन्य तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चौघेही कल्याणमध्ये मोलमजूरी करुन राहत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black & White : 'खालिद का शिवाजी' चित्रपटावर सरकारनं बंदी का आणली? दिगदर्शकाचा मोठा खुलासा

PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

SCROLL FOR NEXT