Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : तिकीट बुकिंग नावाखाली विदेशी दारूची तस्करी; उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार उघड, एकाला अटक

Kalyan News : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या दुकानात तिकीट बुकिंग च्या नावाखाली महागड्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्री सुरू होती

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: तिकीट बुकिंग करण्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे महागड्या विदेशी मद्याची विक्री केली जात होती. विक्री करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या कल्याण विभागाच्या पथकाने उल्हासनगर येथे एका दुकानात छापा टाकत ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे १ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. 

उल्हासनगरमधील गांधी रोड परिसरातील यश क्रिएशन शॉप नंबर ६ मध्ये अवैधरित्या मद्याचा साठा करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याणच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या दुकानात तिकीट बुकिंग च्या नावाखाली महागड्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्री सुरू होती.

परदेशातून आयात करत मद्याचा साठा 

या कारवाईत राजेश विषणदास छाबरिया याने परदेशातून आयात केलेल्या स्कॉच या मद्याचा विनापरवाना साठा केल्याचे आढळून आला. या मद्याची किमंत १ लाख ७ हजार ८२९ रुपये असून हे मद्य जप्त करत राजेश छाबरिया यात अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक दीपक परब यांनी दिली.

बदलापुरातील तीन कत्तलखाने जमीनदोस्त 

बदलापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या कत्तलखान्यांवर धाड टाकत कारवाई केली होती. यानंतर गुरुवारी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर ऍक्शन मोडमध्ये आलेल्या पालिका प्रशासनाने कत्तलखान्यांवर बुलडोझर चालवत ते जमीनदोस्त केले. या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: कोल्हापूरच्या कणेरी मठावर सिद्धगिरी कारागीर महाकुंभ महोत्सवाला सुरुवात

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT