Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसूती; चौकशीला सुरवात, कारवाईचे दिले संकेत

Kalyan News : रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसूती; चौकशीला सुरवात, कारवाईचे दिले संकेत

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला घेण्यास नकार दिल्यानंतर महिलेची रुग्णालयाच्या (Hospital) प्रवेशद्वारावरच प्रसूती झाली होती. ही घटना समोर आल्यानंतर (Kalyan) खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. घटनेच्या चौकशीअंती कारवाई करण्याचे संकेत पालिका उपायुक्तांनी दिले आहेत. (Live Marathi News)

कल्याण येथे शनिवारी रात्री एका महिलेला स्काय वॉकवर प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. तेव्हा नागरीकांनी हे पाहून त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलेला हमालांच्या मदतीने तातडीने हात गाडीवर टाकून रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयाने या महिलेची प्रसूती करुन घेण्यास नकार दिला. पोलिसांनी केलेली विनंती देखील डॉक्टरांनी मानली नाही. अखेर महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली. या घटनेनंतर रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली. 

सीसीटीव्ही ही तपासले जाणार 

महापालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी आज रुग्णालयात जाऊन चौकशी सुरु केली आहे. याबाबत बोलताना प्रसाद बोरकर यांनी महापालिकेच्यावतीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्या घटनेच्या वेळी उपस्थित असणारे सगळे कर्मचारी वैद्यकीय अधिकारी व घटनेचे संबंधित लोकांशी स्टेटमेंट घेणं सुरू आहे. त्यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जातील. त्यानंतर आयुक्तांच्या मान्यतेनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. या घटनेचा मनसे व ठाकरे गटाकडून देखील निषेध नोंदवण्यात आला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात जाऊन घटनेचा निषेध नोंदवला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला धमकी, २ कोटी दे नाहीतर...

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Rahul Gandhi: राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी; VIDEO ने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT