Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : कल्याणमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरे गटाला चारही जागा गेल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Kalyan News : दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कोकणासह कल्याण- डोंबिवलीत काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा जागा मिळालेली नाही. यामुळे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने जागा वाटपात कोकणासह कल्याण डोंबिवलीत काँग्रेसला बाजूला ठेवल्याचा आरोप करत कल्याण डोंबिवलीतील कोंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत कोंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली. 

कल्याण- डोंबिवलीमधील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघावर काँग्रेसने दावा केला होता. मात्र या दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडत महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) काँग्रेसची स्थिती दुय्यम का? असा सवाल केला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही लोकसभेत तुतारीचे काम करायचे आणि विधानसभेत मशालचे काम करायचे का? कोकणासह कल्याण- डोंबिवलीत (Congress) काँग्रेसला बाजूला ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संधी दिली गेल्याचा आरोप त्यांनी केला.

तर पाठींबा देणार नाही 
दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जिवंत ठेवायचे असेल, तर कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या विधानसभा जागांबाबत दोन दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा, काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत निर्णत घेतील; असे आवाहन केले आहे. दरम्यान कोंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत त्यांनी सांगितले की कोंग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, अद्याप मला एबी फॉर्म मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT