Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News : महिनाभरापूर्वी जेलमधून सुटला पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात; वीस मिनिटात केल्या होत्या दोन चैन स्नेचिंग

Kalyan News महिनाभरापूर्वी जेलमधून सुटला पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात; वीस मिनिटात केल्या होत्या दोन चैन स्नेचिंग

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आकाश पारचे आणि कुणाल देहडे अशी या दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. या दोघांनी अवघ्या वीस मिनिटात दोन महिलांची चैन स्नेचिंग (Chain Snatching) करत धूम ठोकली होती. कोळशेवाडी पोलिसांनी बारा तासाच्या आत दोघांना बेड्या ठोकल्यात. (Kalyan) आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहेत. महिनाभर पूर्वी तो जेलमधून सुटला होता. जेलमधून सुटल्यावर त्याने आधी बाईक चोरी केली. नंतर आपल्या साथीदाराच्या मदतीने चैन स्नेचींग सुरू केली. (Breaking Marathi News)

काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व ६० फुटी रोडवर चालणाऱ्या एका महिलेची चैन हिसकावून दोन चोर दुचाकीवरून पळून गेले होते. याच दोन चोरट्यानी अवघ्या काही मिनिटात कल्याण पश्चिम येथे रस्त्याने पायी चालणाऱ्या एका शिक्षिकेची देखील चैन लंपास करत धूम ठोकली होती. अवघ्या वीस मिनिटात दोन चैन स्नेचिंग केल्या. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीपी कल्याणजी घेटे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. 

सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासात आकाश उर्फ बाबू पारचे, कुणाल देहडे या दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्यात. तपासादरम्यान आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात या आधी देखील विविध पोलीस ठाण्यामध्ये चैन स्नेचिंग व मोटरसायकल चोरीचे तब्बल २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. कोळशेवाडी पोलिसांनी अवघ्या बारा तासात या दोन्ही सराईत आरोपींना बेड्या ठोकल्यात त्यांनी आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT