Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : क्षुल्लक कारणावरून दिव्यांग मुलासह पती- पत्नीला मारहाण; कल्याणमधील धक्कादायक घटना

Kalyan News : कल्याण पश्चिम गांधारी परिसरातील लोढा गार्डन जय या इमारतीमध्ये हि घटना घडली आहे. या इमारतीत वास्तव्यास असलेल्या दोन कुटुंबात वाद निर्माण झाला;

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पश्चिम गांधारी परिसरातील इमारतीत दोन परिवारांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. (Kalyan) या वादातून इमारतीमधील एका कुटुंबातील परिवाराने दिव्यांग मुलासह पती- पत्नीला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. (Breaking Marathi News)

कल्याण पश्चिम गांधारी परिसरातील लोढा गार्डन जय या इमारतीमध्ये हि घटना घडली आहे. या इमारतीत वास्तव्यास असलेल्या दोन कुटुंबात वाद (Crime News) निर्माण झाला. गार्डनमध्ये काही मुलं दुपारच्या सुमारास झोक्याबरोबर खेळत होती. आवाज होत असल्याने इमारतीमधील मदनसिंग बिस्ट या रहिवाशाने मुलांना तेथून जाण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या लक्ष्मण नाईक, त्यांची पत्नी आशा यांनी बिस्ट कुटुंबासोबत वाद घातला. याच वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. बिस्ट यांच्यासह त्यांचा दिव्यांग मुलगा व पत्नीला देखील मारहाण करण्यात आली. हा प्रकार घडत असताना याच इमारतीतील काही जणांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडियो व्हायरल
सदर मारहाणीची घटना होत असताना काहींनी मोबाईलमध्ये व्हिडीओ केला. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान या प्रकरणी (Khadakpada Police) खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीसांकडून (Police) तपास सुरू करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

Buldhana : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! कॉलेजला जातानाच १९ वर्षाच्या ॠतूजाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT