Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: सात महिन्यानंतर सापडला शिंदे गटाचा बॅनर काढणारा व्यक्ती; सीसीटीव्हीमुळे लागला शोध

सात महिन्यानंतर सापडला शिंदे गटाचा बॅनर काढणारा व्यक्ती; सीसीटीव्हीमुळे लागला शोध

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण पूर्व भागातील विजयनगर परिसरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बॅनर गेल्या (Kalyan News) सहा महिन्यापासून फाडले आणि काढले जात होते. त्यामुळे बॅनर लावणाऱ्या पदाधिकाऱ्याने सीसीटीव्ही (CCTV) लावले. तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. या सीसीटीव्हीत एक व्यक्ती बॅनर काढून फेकताना दिसून आला. (Tajya Batmya)

कल्याण पूर्व भागातील विजयनगर परिसरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेविका माधूरी काळे यांच्याकडून गेल्या सहा महिन्यांपासून बॅनर लावले होते. मात्र रात्रीच्या अंधारात कधी फाडले जात होते. तर कधी काढले जात होते. अखेर त्या व्यक्तिला शोधण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही लावले. या सीसीटीव्हीत बॅनर काढून फेकणारा व्यक्ती दिसून आला आहे.

दरम्यान याच व्यक्तीने काळे यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बॅनर लावू नये असे सांगितले होते. यावरुन वाद झाला होता. तो व्यक्ती सातत्याने बॅनर काढण्याचे काम करीत होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात काळे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. अखेर पोलिसांनी बॅनर काढणाऱ्या करण आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT