KDMC  Saam tv
महाराष्ट्र

KDMC : अनधिकृत बांधकाम, नळजोडणीस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई; केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

Kalyan News : अनधिकृत बांधकामांमधील चाळींच्या सोशल मीडियावर जाहिराती सुरू असतात. कमी किमतीत घरांचे आमिष दाखवून अनधिकृत घरे बांधली जात आहेत ही फसवणूक टिटवाळा बल्यानी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण जवळील कल्याणी टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे चाळींचे बांधकाम सुरू आहे. केडीएमसीच्या पथकाने आज बल्यानी परीसरातील अनधिकृत चाळींवर हातोडा चालवला. तसेच चाळींना देण्यात आलेल्या अनधिकृत नळ जोडण्या देखील तोडण्यात आल्या. दरम्यान हि कारवाई करण्यासोबत या प्रकारांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे. 

कल्याण जवळील टिटवाळा बल्यानी परिसरात मोठ्या प्रमाणात चाळींची अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांमधील चाळींच्या सोशल मीडियावर जाहिराती सुरू असतात. गरीब गरजुंना कमी किमतीत घरांचे आमिष दाखवून ही अनधिकृत घरे बांधली जात आहेत. ही फसवणूक टिटवाळा बल्यानी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दिवसाढवळ्या खुलेआम ही बांधकामे सुरू असतात. तक्रार आल्यानंतर केडीएमसीचे पथक या बांधकामांवर कारवाईचा दिखावा करते. त्यानंतर पुन्हा बांधकामे बिनदिक्कत सुरू होतात.

५० हुन अधिक घरे जमीनदोस्त 

आज देखील केडीएमसीच्या पथकाने बल्यानी परिसरातील ५० हुन अधिक जोते वीस ते पंचवीस चाळी जमीनदोस्त केलय. त्या पाठोपाठ या चाळींना देण्यात येणाऱ्या अनधिकृत नळ कनेक्शन देखील कट केले. मात्र या अनधिकृत बांधकामाचा जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अनधिकृत घरांवर कारवाई झाल्यानंतर गरीब गरजूंच्या संसार उघड्यावर पडत आहे. या अनधिकृत बांधकामाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. मात्र प्रशासनाकडून साधी नोटीस देण्याची देखील तसदी घेतली जात नसल्याचे दिसून येते.

त्या अधिकाऱ्यांवर देखील होणार कारवाई 

दरम्यान या प्रकाराबाबत याबाबत केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितले की याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारी असल्याने त्याऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्याला त्या जागेवर नेमलं आहे. तसेच अनधिकृत बांधकाम व अनधिकृत नळ जोडणी बाबत चौकशी करून यासाठी जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल; असे अतिरिक्त आयुक्त गोडसे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT