KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : ९५ लाखाचा मालमत्ता कर थकविला; पेट्रोल पंप चालकाचे कार्यालय सील, केडीएमसीची कारवाई

Kalyan News : वारंवार सूचना, नोटीस दिल्यानंतर देखील मालमत्ता कराचा भरणा करण्याकडे थकबाकीदार दुर्लक्ष करत असतात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलल्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे. अशातच तब्बल ९५ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या पेट्रोल पंप चालकाविरोधात कारवाई करत कार्यालय सील करण्यात आले आहे.

वारंवार सूचना, नोटीस दिल्यानंतर देखील मालमत्ता कराचा भरणा करण्याकडे थकबाकीदार दुर्लक्ष करत असतात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. अशाच प्रकारे (Kalyan) कल्याण पश्चिमेकडील रोशन पेट्रोल पंप मालकाने मालमत्ता करापोटी केडीएमसीचे तब्बल ९५ लाख रुपये थकवले होते. अनेकदा नोटीसा पाठवून देखील त्याने थकीत रकमेचा भरणा केला नाही. केडीएमसीला दाद दिली नाही. अखेर आज (KDMC News) केडीएमसीच्या पथकाने रोशन पेट्रोल पंपचे कार्यालय सील केले आहे.  

तर पेट्रोल पंप करणार सील 

पंप चालकाचे कार्यालय सील केल्यानंतर कर भरणा करण्यास आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अर्थात पुढील आठ दिवसात जर थकीत रकमेचा भरणा केला नाही; तर पेट्रोल पंप सील करण्यात येईल; असा इशारा देखील केडीएमसी अधिकाऱ्यांनी यावेळी दिला. केडीएमसीच्या या धडक कारवाईमुळे मालमत्ता कर थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT