Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : कसारा- सीएसएमटी लोकलमध्ये सापडली २० लाखांची रोकड

Kalyan News : कसारा- सीएसएमटी लोकल ट्रेन २२ सप्टेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कसारा- सीएसएमटी लोकलमध्ये रात्रीच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्थानकावर २० लाख रोकड असलेली बॅग आढळून आली. एका प्रवाशाला ही बेवारस बॅग आढळल्याने त्याने याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती देत ही बॅग कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली .कल्याण रेल्वे पोलिसांनी बॅग कोणाची आहे याचा तपास सुरू केला आहे

कसारा- सीएसएमटी लोकल ट्रेन २२ सप्टेंबरला रात्री दहा वाजण्याच्या (Kalyan) सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. या दरम्यान लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला एक बॅग बेवारस पडलेली आढळून आली. त्याने तत्काळ याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना (Railway Police) माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी बॅग उघडून पाहिले असता या बॅगेत तब्बल वीस लाखांची रोकड होती. इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

पोलिसांकडून तपास सुरु 

कल्याण रेल्वे पोलिसांनी सदरची बॅग ताब्यात घेत सुरवातीला बॅग कोणाची याची विचारणा केली. मात्र कोणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने बॅग जप्त केली आहे. दरम्यान सदरची बॅग कुणाची आहे, कोण विसरले याचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT