Kalyan Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kalyan News : खळबळजनक! कल्याणमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन; शिक्षिकेने छळ केल्याचा चिठ्ठीत उल्लेख

Kalyan Crime News : आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली.

Satish Daud

अभिजित देशमुख साम टीव्ही

आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विघ्नेश प्रमोद कुमार पात्रा (वय 13) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी विघ्नेशने सुसाईट नोटही लिहून ठेवली आहे. यामध्ये शिक्षिकेसह एका मुलाच्या (Student) नावाचा उल्लेख करण्यात आलाय. दोघांनी मला चिडवल्याने मी टोकाचं पाऊल उचलत असल्याचं विघ्नेशने सुसाईट नोटमध्ये लिहून ठेवलंय.

घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव विघ्नेशचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी नोंद करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विघ्नेश हा आपले वडील प्रमोद कुमार आई आणि बहिणी सोबत कल्याण पूर्वेकडील (Kalyan News) शिवाजी कॉलनी चिकणीपाडा परिसरातील राहत होता.

विघ्नेश कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. रविवारी त्याचे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले. तर आई व बहीण कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याने सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास विघ्नेशने राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश जवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये एका मुलासह शिक्षिकेचा उल्लेख आहे. या दोघांनी चिडवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केल्याचे प्राथमिक माहिती आहे. या घटनेची कोळशेवाडी पोलिसांनी नोंद करत पुढील तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT