Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : रिक्षात बसताच प्रवाशांचे दागिने क्षणात व्हायचे गायब; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले

Kalyan News : कल्याणमधील एका बँकेतील लॉकरमधून सहा तोळे दागिने घेऊन कल्याण स्टेशनला आली. महिला रिक्षाने घरी निघून गेली. मात्र घरी गेल्यावर पर्स तपासली असता तिला धक्काच बसला. तिच्या पर्समध्ये दागिने नव्हते

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: रिक्षामध्ये प्रवाशी बसल्यानंतर त्यांच्याजवळ असलेले मौल्यवान दागिने गायब होत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून कल्याण आणि आजूबाजूच्या शहारात समोर आले आहेत. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी एका दाखल गुन्ह्याच्या तपास सुरू केला असता या मागचे खरे कारण समोर आले आहे. यात एक महिला आणि मुलीचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. 

दोन दिवसापूर्वी एक वयोवृद्ध महिला कल्याणमधील एका बँकेतील लॉकरमधून सहा तोळे दागिने घेऊन कल्याण स्टेशनला आली. महिला रिक्षाने घरी निघून गेली. मात्र घरी गेल्यावर पर्स तपासली असता तिला धक्काच बसला. तिच्या पर्समध्ये दागिने नव्हते. या प्रकरणात वयोवृद्ध महिलेने कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार केली. या आधी देखील कल्याण स्टेशन परिसरात रिक्षात काही वस्तू चोरीस गेल्याची घटना घडल्या आहेत. 

महिला, मुलीची हातचलाखी 

दरम्यान कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. धक्कादायक माहिती समोर आली. सीसीटीव्हीत एक महिला तिच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत रिक्षात बसते. ही महिला संधीचा फायदा घेत दागिने किंवा मोबाईल अशा किंमती वस्तू चोरुन पसार होते. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या या महिलेने भिवंडी शहरात देखील या महिला आणि मुलीने असे अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांकडून शोध सुरु 

कल्याण शहर व परिसरात घडलेल्या घटनांमध्ये महिला व मुलीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलीस या महिलेच्या मागावर आहेत. सीसीटीव्हीचे आधारे पोलिसांनी या महिलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही महिला अवघ्या काही मिनिटात पुन्हा रिक्षा बदलते. त्यामुळे पोलिसांसमोर त्या महिलेला पकडण्याचा आवाहन उभे ठाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

Nail Art Designs: लग्नसराईसाठी ट्राय करा नवा नेल आर्ट, पाहा हे ७ ट्रेंडी डिझाइन्स

लेकीसाठी बाप भिडला बिबट्याशी... पण पुढे जे घडलं ते थरारक!

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

ऐश्वर्या रॉय ते दीपिका पादुकोण, तुमच्या लाडक्या अभिनेत्रींचे 'डॅडी' कोण? 5 फोटो पाहा

SCROLL FOR NEXT