Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : भाजप पदाधिकारी हल्ला प्रकरणी दोघे ताब्यात; तीनजण अजूनही फरार

Kalyan News : दोन दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे यांच्यावर दोन ते तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्याची हि घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याणमधील भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु करण्यात आला होता, यानंतर बाजारपेठ पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर यातील आणखी तीन जण फरार असून त्यांचा शोध अद्याप सुरु आहे. 

बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये संदीप महाले आणि सूरज भालेराव यांचा समावेश आहे. दोन दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे यांच्यावर दोन ते तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्याची हि घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. या हल्ल्यात हेमंत परांजपे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

सीसीटीव्ही फुटेजवरून शोध 

कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरु केला होता. यात दिसणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संदीप महाले आणि सूरज भालेराव अशी या तरुणांची नावे आहे. हल्ला झाला त्या दिवशी परांजपे लग्न समारंभात झालेल्या वादातून परांजपे यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ला प्रकरणात आणखीन तीन जणांचा पोलिस शोध घेत आहेत. 

हल्ला झाल्याचे कारण अस्पष्ट 

दरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असले तरी भाजप पदाधिकारी परांजपे यांच्यावर हल्ला का केला? कुणाच्या सांगण्यावरून हा हल्ला केला? हल्ल्याच्या मागील मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत. एका लग्न समारंभात परांजपे यांच्यासोबत झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ताब्यातील दोघांकडून याबाबत चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT