kalyan crime news  saam tv
महाराष्ट्र

कल्याणमध्ये दोन लाखाच्या बनावट नोटा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

कल्याणमधील पोलिसांनी बनावट नोटांविरोधात मोठा कारवाई केली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याणमधील (Kalyan) पोलिसांनी बनावट नोटांविरोधात (Fake Notes) मोठी कारवाई केली आहे. कल्याण येथील एका विश्रांती गृहात छापा मारून कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. (Kalyan Crime News )

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी करण रजक (रा. पत्रीपूल), सुरत पुजारी (रा. पत्रीपूल), मोहम्मद आरिफ (रा. उत्तर प्रदेश) या आरोपींना अटक केली आहे. करण हा पत्रीपुलाजवळ राहतो आणि तो रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. तर सुरज हा रेल्वे स्थानक भागात हमालाचे काम करतो आणि काही दिवस मोहम्मद पत्रीपूल भागात राहत होता. त्याची करण, सुरजशी ओळख झाली होती. या तीन जणांचा मुख्य सूत्रधार दिल्लीत आहे. तो या बनावट नोटा वितरित करण्याचे काम करतो, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय चलानातील २०० रुपयांच्या दोन लाख रुपयांच्या नोटा छाप्यातून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना कल्याण पश्चिमेतील एका विश्रांती गृहात एका खोलीत तीन जण थांबले आहेत. ते बनावट नोटांचा व्यवहार करण्यासाठी आले आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती.पोलिसांनी त्वरित विश्रांती गृहा भोवती सापळा लावला. जेणेकरून आरोपी पळून जाता कामा नये. साध्या वेशातील एक पोलीस आरोपी बसलेल्या खोलीत पाठविण्यात आला. त्याने तीन जणांना ‘तुम्ही येथे काय करता’ अशी विचारणा केली.

त्यावेळी तीन जण घाबरले. ते उलट सुलट उत्तरे देऊ लागले. त्यांनी खोलीतून पळण्याची तयारी सुरू केली. पोलिसाने वरिष्ठांना इशारा करताच एकावेळी शोध पथक खोलीत शिरले आणि तीन जणांना ताब्यात घेतले. खोलीतील सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या.पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता, पोलिसांना त्यांच्या जवळ भारतीय चलनी व्यवहारातील दोन लाख रुपयांच्या दोनशे रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत. दरम्यान बनावट नोटा विविध प्रकारच्या दुकानांमध्ये जाऊन वस्तू खरेदीच्या माध्यमांतून वटविल्या जात होत्या, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

Maharashtra News Live Update: नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

SCROLL FOR NEXT