Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : ज्योतिषाकडे हात दाखवू म्हणून नेले अन् खुर्चीला बांधले; माजी नगरसेविकेच्या पतीसोबत घडले भयंकर

Kalyan News : कल्याण पूर्वेत राहणारे विजय गायकवाड हे केबल व्यावसायिक आहेत. तर त्यांची पत्नी हि माजी नगरसेविका आहे. दोघेही काही दिवसांपासून आजारी होते. याच गोष्टीचा गैरफायदा

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: ज्योतिषाकडे नेवून सतत आजारी पडत असल्यावर उपाय सांगण्यासाठी घेऊन गेले. मात्र रूममध्ये एका खुर्ची बांधून लुबाडणूक केल्याचा प्रकार कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात घडला आहे. मोबाईल व रोकड घेऊन पसार झालेल्यांमधील एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कल्याण (Kalyan) पूर्वेत राहणारे विजय गायकवाड हे केबल व्यावसायिक आहेत. तर त्यांची पत्नी हि माजी नगरसेविका आहे. दोघेही काही दिवसांपासून आजारी होते. याच गोष्टीचा गैरफायदा घेत याच परिसरात राहणाऱ्या गिरीश खैरे याने गायकवाड यांना लुबाडण्याचा प्लॅन केला. त्यानुसार विजय गायकवाड यांना आपल्या ओळखीतील ज्योतिषाला तुमचा हात दाखवू, तो उपाय सांगेल असे आमिष दिले. यानंतर खैरेने विजय गायकवाड यांना आडीवली येथील एका इमारतीत नेले. तिथे आधीच दोन व्यक्ती उपस्थित होते. त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून गिरीश तेथून निघून गेला.

गिरीश निघून गेल्यानंतर त्या दोघांनी विजय गायकवाड यांना खुर्चीला बांधले आणि त्यांच्या जवळील मोबाईल व रोकड हिसकावली. त्यानंतर दोघे पसार झाले. गायकवाड यांनी स्वत:ची सुटका करत मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी राम चोपडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. गायकवाड यांना त्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या गिरीश खैरे याला अटक करण्यात आली. मात्र त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT