Kalyan Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kalyan Crime News: पोलिसांचा कोळशेवाडी पॅटर्न! जिथे माज केला तिथेच गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून वरात काढली

Kalyan Crime News: पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शिरसाट यांनी पावले उचलली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

Crime News:

सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास देणे, भर रस्त्यात तरुणांना मारहाण करणे, रात्री गोंधळ रहिवासी परिसरात गोंधळ घालणे अशी कामे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रुपेश कनोजिया असं त्याचं नाव असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या कनोजिया याची दशहत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्याची त्याच परिसरातून वरात देखील काढलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण पूर्वेत गंभीर स्वरुपाच्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. काही धक्कादायक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग असतो. त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना अडचणी येतात. पोलिसांसमोर गुन्हे कमी करण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शिरसाट यांनी पावले उचलली आहे.

सराईत गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार रुपेश कनोजिया एका ठिकाणी एका व्यक्तिला मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू शिरसाट यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले.

रुपेश पळून जाण्याच्या तयारीत होता. अशात पोलिसांना त्याची टीप मिळाली होती. त्यानुसार त्याला चारही बाजूने घेरून अटक करण्यात आली आहे. २०२१ पासून रुपेशने गुन्हे करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रुपेशच्या विरोधात तडीपारीची आणि एमपीडीए कारवाई प्रस्तावित केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

America Shutdown: ट्रम्प यांना जोरदार धक्का; अमेरिकेत शटडाऊन, सरकारी काम ठप्प, पगारावरही संकट

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Veg Pulao: दसऱ्याला चमचमीत खावसं वाटतंय? झटपट करा हा हॉटेल स्टाईल चमचमीत पुलाव

Prakash Ambedkar : ओला दुष्काळ जाहीर करायला वेळ का?; दुष्काळाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा

SCROLL FOR NEXT