अभिजित देशमुख
कल्याण : वृद्ध महिला घरात एकटी असल्याची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश केला. यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्रासह दागिने हिसकावले. महिलेने प्रतिकार केला असता तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण जवळील अटाळी परिसरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. खडकपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
कल्याण जवळील अटाळी परिसरातील रंजना पाटकर (वय ६०) असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान रजनी पाटकर त्यांचे पती व मुलगा कामानिमित्त बाहेर गेले होते. दोघे सायंकाळी घरी परतले असता रजनी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आला. हे पाहून दोघांना धक्का बसला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
एक लाखाच्या दागिन्यांसाठी घेतला जीव
दरम्यान महिलेच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याचे तपासात समोर आले. अज्ञात इसम पाटकर घरी एकट्याच असल्याची संधी साधत घरात घुसला. रजनी यांच्याजवळील मंगळसूत्रासह सुमारे एक लाख रुपये रुपये किमतीचे दागिने हिसकावले. यावेळी रजनी यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्यावर हल्ला केला व या हल्ल्यात रजनी यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
कल्याण अटाळी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेबाबत मृत महिलेच्या पतीने खडकपाडा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी चोरी करून हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आहे. तसेच पोलिसांनी रजनी पाटकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून यातून माहिती समोर आल्यानंतर तपासाला गती मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.