Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : गुजरातमधून मुंबईला येत करायचे चैन स्नॅचिंग; दोघे चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : कल्याण पश्चिम येथील पूर्णिमा चौक परिसरात रस्त्यावर आपल्या मुलांसोबत जात असताना एका महिलेची चैन स्नेचिंग करून चोरटे प्रसार झाल्याची घटना घडली होती. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना गाठत गळ्यातील चैन तोडून पसार होत असल्याचे घटना घडल्या होत्या. यात गुजरातमधून येऊन ठाणे आणि पालघर जिल्ह्यात चैन स्नेचिंग करणाऱ्या एका टोळीच्या दोन चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु असून आणखी दोघांचा शोध सुरु आहे. 

काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिम येथील पूर्णिमा चौक परिसरात रस्त्यावर आपल्या मुलांसोबत जात असताना एका महिलेची चैन स्नेचिंग करून चोरटे प्रसार झाल्याची घटना घडली होती. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला होता. दरम्यान घटना घडलेल्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता दोनजण आढळून आहे. 

सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने शोध 

सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कन्नूभाई सोलंकी आणि शरीफ खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी कन्नूभाई हा गुजरातमध्ये कडीयाचे काम करतो. कन्नुभाई आणि त्याचा जोडीदार गुजरातमधून मुंबईला मजुरीच्या कामाच्या नावाने यायचे. यानंतर मुंबई शहर व उपनगरात चोरी करण्याचे काम करायचे. 

दोघांचा शोध सुरु 

मुंबई व उपनगरात होत असलेल्या चैन स्नेचिंग करणाऱ्यांमधील टोळीच्या दोन चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र दोन जण अजूनही फरार असून त्या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. जिग्नेश घासी आणि जसवंत मीना या दोघांचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT